प्रतिनिधी/ बेळगाव
कृषी दिनाचे औचित्य साधून जोयडा तालुक्मयातील कृषी अधिकाऱयांनी आंsकार वागळे यांचा ‘प्रगतशील शेतकरी’ या पुरस्काराने सन्मान केला आहे. त्यांनी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून फळे व इतर पिकांचे भरघोस उत्पादन घेतले आहे. याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांनी कॅसलरॉकजवळील बागायतीमध्ये केळी, सुपारी, मिरी, वेलची, पपई, शेवगा यांची लागवड केली आहे. रासायनिक खतांचा वापर न करता सेंदिय पद्धतीने एकाच शेतामध्ये पाच व त्यापेक्षा अधिक पिके घेणे हा पालेकर मॉडेलचा अवलंब त्यांनी केला आहे.
ओंकार हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून एक आवड म्हणून शेती करीत आहेत. सेंदिय शेतीसाठी त्यांनी गायींचीही जोपासना केली आहे. सुपारी व वेलची यांचीही नर्सरी केली आहे.