बेळगाव /प्रतिनिधी
‘उंबर असे जिथे तिथे दत्तगुरुचा वास असे तिथे’ असे म्हटले जाते. बऱयाच ठिकाणी उंबराच्या झाडाची लागवड केली जाते. मात्र, अनेक ठिकाणी ते आपोआप आलेले असते. पक्ष्यांच्या वि÷sतून ते निर्माण झालेले असते. अशाच प्रकारे भाग्यनगर आठवा क्रॉस येथील मंगल हेब्बाळकर यांच्या अंगणात उंबराचे झाड आले आहे. विशेष म्हणजे दरवषीच्या तुलनेत यंदा मोठय़ा प्रमाणात उंबराच्या झाडाला बहर आला आहे.
दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर उंबराच्या झाडाला मोठय़ा प्रमाणात उंबर लागल्यामुळे हा एक योगायोगच असल्याचे हेब्बाळकर कुटुंबीयांना वाटते आहे. ते या उंबराच्या झाडाच्या फळाचा उपयोग औषधासाठी करतात. उंबराचे फळ लहान असताना त्याची भाजीही करतात. अंगणात असलेल्या या उंबराच्या झाडाचा उपयोग पक्ष्यांना मोठय़ा प्रमाणात होतो. पक्षी आपली भूक भागविण्यासाठी ही फळे खातात, त्यामुळे त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो, असे सांगतात.
उंबराचे वृक्ष सर्वत्र आढळतात. जंगलात, नदीच्या किनारी, डोंगर कपारीत, रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर वाढलेले दिसतात. मंदिर व देवळाच्या परिसरात धार्मिक स्थळी उंबराची लागवड केली जाते. उंबराच्या झाडाला वर्षातून तीनदा बहर येतो. जुलै, सप्टेंबर आणि डिसेंबर या काळात त्यांचे अंगण उंबराच्या फळांनी भरलेले असते.