ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
मूळची कश्मीर येथे जन्मलेली आयशा शहा हिची अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या ‘डिजिटल स्ट्रॅटेजी टीम’मध्ये पार्टनरशिप मॅनेजर पदावर निवड झाली आहे. या टीमचे नेतृत्व रॉब फ्लेहर्टी करणार आहेत.
व्हाईट हाऊसकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयशा ही काश्मीरमध्ये जन्मलेली असून, सध्या ती अमेरिकेच्या लुझियानामध्ये स्थायिक आहे. ती स्मिथसोनियन संस्थेसाठी ॲडव्हान्समेंट स्पेशालिस्ट म्हणून काम करते. यापूर्वी तिने बायडेन-कमला हॅरिस यांच्या निवडणूक प्रचारातही डिजिटल पार्टनशिप मॅनेजर म्हणून काम पाहिले होते.
आयशाने यापूर्वी बुय येथे स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन स्पेशलिस्ट म्हणूनही काम पाहिले आहे.