आम आदमी पार्टीचे सोलापूर जिल्ह्यात खाते उघडले
प्रतिनिधी / सोलापूर
सार्वत्रिक निवडणूक २०२०-२१ ग्रुप ग्रामपंचायत सोलापूर जिल्हा, हत्तूर-चंद्रहाळ, प्रभाग क्र ३ (कुलकर्णी तांडा आणि इतर वाडी वस्ती) येथून आम आदमी पार्टी पुरस्कृत २ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. खुल्या प्रवर्गात श्रीमती चांदूबाई चव्हाण आणि ओबीसी पुरुष प्रवर्गातून विजय राठोड यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यात गावातील अनेक जेष्ठ राजकारणी विद्यमान सरपंच धर्मराज राठोड, पॅनल प्रमुख अन्नापा सतूबर, सूर्यकांत पाटील, वकील राजू राठोड, राजू भरले(सावकार ) यांचे मोलाचे योगदान लाभले. आम आदमी पार्टी च्या वतीने खाजाअमीन अत्तार , श्रीकांत भरले आणि सागर वाले यांच्याकडून सर्व माघार घेतलेल्या उमेदवारांचे आभार मानन्यात आले आणि अभिनंदन समारंभ घेण्यात आले.
यावेळेस आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री सागर पाटील, ऍड. खतीब वकील, अस्लम शेख, अतिश गायकवाड, जैनुद्दीन शेख, बाबा सगरी, रहीम शेख, रॉबर्ट गौडर, खालिद हुलकुंड, भारत अली आदी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातून आम आदमी पार्टीला एन्ट्री देण्याचे काम सोलापूरच्या हत्तूर मधील ग्रामस्थांनी केले आहे आणी आम आदमी पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद जी केजरीवाल यांचे देशाचे विकासाचे स्वप्न आता आपल्या सोलापूर च्या हत्तूर-चंद्रहाळ गावातून साकार होताना आपल्याला दिसणार आहे. त्याच सोबत नाशिक आणि गोंदिया जिल्ह्यातून सुद्धा 1-1 उमेदवार बिनविरोध निवडुन आले आहेत.