ऑनलाईन टीम / जकार्ता :
जकार्तामधील सुकिर्णो हत्ता आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण करून अवघ्या चार मिनिटात बेपत्ता झालेल्या विमानाचे संशयास्पद अवशेष जकर्तामधील समुद्रात सापडले आहेत. प्रवाशांचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती इंडोनेशियाचे परिवहन मंत्री बुदी करया यांची दिली.
अपघातग्रस्त विमान बोईंग 737-500 या प्रकारातील होते. श्रीविजया एअर फ्लाईट 182 असे या विमानाचे नाव असून, विमानात 12 कर्मचारी आणि 62 प्रवासी होते. जकर्तामधील वेळेनुसार शनिवारी दुपारी 2.36 वाजता विमानाने उड्डाण केले. त्यानंतर 2.40 वाजता म्हणजेच 4 मिनिटात या विमानाचा संपर्क तुटला होता.