रविवार दि. 10 ते शनिवार दि.16 जानेवारी 2021
मेष
या सप्ताहात मकर राशीत सूर्यप्रवेश, बुध, गुरु युती होत आहे. प्रवासात घाई करू नका. धंद्यात जम बसेल. मोठे काम मिळवा. मागील येणे वसूल करा. नोकरीत तुमचे कौतुक होईल. नवीन नोकरी शोधता येईल. कठीण कामे करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्याला योग्य वळण देता येईल. नवे डावपेच टाकता येतील. संसारातील उणीव भरून काढता येईल. विवाह जमवता येईल. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षणात मनाप्रमाणे प्रगती करू शकाल.
वृषभ
या सप्ताहात मकरेत सूर्यप्रवेश, बुध, शनि युती होत आहे. व्यसन करू नका. खाण्याची काळजी घ्या. धंद्यात गोड बोलणाऱया व्यक्तीपासून सावध रहा. संसारात समस्या सोडवावी लागेल. खर्च वाढेल. प्रवासात घाई करू नका. नोकरीत काम वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा नावलौकिक बिघडवण्याचा प्रयत्न केला जाईल. विरुद्धलिंगी व्यक्ती फसवेल. शिक्षणात आळस नको. जिद्द ठेवा.
मिथुन
या सप्ताहात मकरेत सूर्यप्रवेश, शुक्र, हर्षल त्रिकोणयोग होत आहे. कठीण कामे रेंगाळत ठेवू नका. धंद्यात गोड बोलून रहा. मागील येणे वसूल करा. नोकरीत प्रभाव पडेल. नम्रता ठेवा. कायद्याचे पालन करूनच कोणताही निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनत घ्यावी लागेल. वरि÷ांचा दबाव राहील. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. शेतकरी वर्गाला मालाची विक्री करता येईल. घरातील वृद्ध व्यक्तींची चिंता वाटेल. कलाक्षेत्रात संधी येईल.
कर्क
या सप्ताहात मकरेत सूर्यप्रवेश, बुध, गुरु युती होत आहे. धंद्यात वाढ होईल. क्षुल्लक कारणाने संसारात, मैत्रीत वाद होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला समस्या येईल. नोकरीत काम वाढेल. खाण्याची-पिण्याची चंगळ नको. राजकीय, सामाजिक कार्यातील विरोध कमी होण्यास सुरुवात होईल. नेते, सहकारी यांचा विचार ऐकून घ्या. संसारात छोटासा प्रश्न गंभीर वाटेल. कला, साहित्यात तडजोड करावी लागेल. शिक्षणात मेहनत घ्या. यश मिळवता येईल. शेतकऱयाला मदत मिळेल.
सिंह
या सप्ताहात मकरेत सूर्यप्रवेश, शुक्र, हर्षल त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला किचकट कामे करून घ्या. धंद्यात जास्त मेहनत होईल. जुने येणे वसूल करा. वाद मिटवा. नोकरीत इतरांना सहाय्य करावे लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात धावपळ, दगदग होईल. विरोधक हल्लाबोल करतील. तुम्ही शब्द जपून वापरा. संसारात कामे वाढतील. इतरांना तुमची गरज भासेल. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षणात जिद्द ठेवा. गर्व नको.
कन्या
या सप्ताहात मकरेत सूर्यप्रवेश, बुध, गुरु युती होत आहे. धंद्यातील उणीव भरून काढता येईल. नवे काम मिळेल. नोकरीत काम वाढेल. तरी बुद्धिचातुर्य दिसून येईल. संसारातील जबाबदारी टाळता येणार नाही. खर्च वाढेल. प्रवासात घाई करू नका. राजकीय, सामाजिक कार्याला नवे वळण देता येईल. अचानक कलाटणी मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल. शिक्षणात लक्ष ठेवा.
तुळ
या सप्ताहात मकरेत सूर्यप्रवेश, शुक्र, हर्षल त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात कष्ट घ्यावे लागतील. नोकरवर्गाला कमी लेखू नका. मागील येणे वसूल करा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. संसारात नवा विषय सुरू होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परता ठेवा. सहनशीलता ठेवल्यास महत्त्व टिकवून ठेवता येईल. नवीन ओळखी होतील. शिक्षणात मागे राहू नका. शेतकरी वर्गाला मार्ग मिळेल.
वृश्चिक
या सप्ताहात मकरेत सूर्यप्रवेश, चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. प्रकृतीत सुधारणा होईल. धंद्यात फायदा वाढेल. शेअर्समध्ये योग्य पद्धतीने गुंतवणूक करा. नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. अधिकारात वाढ होईल. संसारातील उणीव भरून काढण्यासाठी प्रयत्न करा. घर, जमीन, खरेदी-विक्रीत फायदा होईल. नवीन परिचय कला, क्रीडा क्षेत्रात होतील. तुमच्या कार्याला प्रसिद्धी मिळेल. शिक्षणात प्रगती कराल.
धनु
या सप्ताहात मकरेत सूर्यप्रवेश, बुध, गुरु युती होत आहे. धंद्यात सुधारणा करता येईल. जुने येणे वसूल करा. नोकरीत प्रभाव दिसेल. वरि÷ खूष होतील. संसारात उत्साहवर्धक घटना घडेल. प्रकृती सुधारेल. राजकीय, सामाजिक कार्याचा विस्तार वेगाने करू शकाल. दौऱयात यश मिळेल. प्रयत्नांचा वेग वाढवा. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षणात पुढे जाल.
मकर
या सप्ताहात तुमच्याच राशीत सूर्यप्रवेश, बुध, शनि युती होत आहे. विरुद्धलिंगी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. गोड बोलण्याला बळी पडू नका. धंद्यात चर्चा सफल होईल. तुमच्या कार्याला नवी दिशा मिळेल. मैत्रीत, संसारात सप्ताहाच्या सुरुवातीला गैरसमज होईल. रागावर ताबा ठेवा. वाहन हळू चालवा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढत जाईल. कला, क्रीडा, साहित्यात, शिक्षणात मेहनत घ्या.
कुंभ
या सप्ताहात मकरेत सूर्यप्रवेश, शुक्र, हर्षल त्रिकोणयोग होत आहे. धंद्यात बेसावध राहू नका. कायदा पाळा. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. वसुली करा. नोकरीच्या ठिकाणी काम, जबाबदारी वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या वक्तव्यावर जोरदार टीका होईल. तुम्ही तुमच्या कार्यावर भर द्या. पद टिकवा. प्रसिद्धी ठेवा. प्रगती करण्याचा प्रयत्न करा. शिक्षणात मेहनत घ्या.
मीन
या सप्ताहात मकरेत सूर्यप्रवेश, बुध, गुरु युती होत आहे. धंद्यात मोठे काम मिळवा. चर्चा करा. वसुली करा. नोकरीत वर्चस्व दाखवता येईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कार्यात वाढ करता येईल. जनहितांचे कार्य करा. पद मिळवा. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षणात पुढे जाता येईल. शेतकरी वर्गाचा उत्साह वाढेल.