ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 16 हजार 946 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 कोटी 05 लाख 12 हजार 093 वर पोहचली असून, मृतांची संख्या 1 लाख 51 हजार 727 एवढी आहे.
बुधवारी दिवसभरात 17,652 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या देशात 02 लाख 13 हजार 603 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 कोटी 01 लाख 46 हजार 763 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 18 कोटी 42 लाख 32 हजार 305 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 7 लाख 43 हजार 191 कोरोना चाचण्या बुधवारी (दि.13 जानेवारी 2021) एका दिवसात करण्यात आल्या.