वार्ताहर / कास
पर्यटनाचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावली तालुक्यातील बामणोली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. सावरी ,म्हावशी , पावशेवाडी व बामणोली या गावांसाठी एकच ग्रुप ग्रामपंचायत बामणोली येथे आहे. इतर गावांनी एकजूट राहून मागील तीन पंचवार्षिक सरपंच पद भोगले आहे. दुसऱ्या गावचे सदस्य बामणोली गावच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात अशी बामणोली ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बामणोली ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला आहे . त्यामूळे या वॉर्डातून निवडून येणाऱ्या दोन सदस्यांच्या जागा रिक्त राहिल्’या आहेत .आम्हाला आमच्या बामणोली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत मिळावी अशा आशयाचे निवेदन नुकतेच बामणोली ग्रामस्थांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सुपूर्द केले आहे.यावेळी बामणोलीची मा. सरपंच राजेंद्र सपकाळ, धनाजी सपकाळ आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.