बेंगळूर : बोगस मतदार ओळखपत्र प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या आमदार मुनिरत्न यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बेंगळूरच्या राजराजेश्वरीनगर विधानसभा मतदारसंघात 2018 मधील निवडणुकीवेळी जालहळ्ळी येथील एका अपार्टमेंटमध्ये बोगस मतदार ओळखपत्रे आणि मुनिरत्न यांच्या प्रचाराची पत्रके आढळून आली होती. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरणी सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी करून संतोषकुमार आणि आनंदकुमार यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. बुधवारी सदर याचिकेवरील सुनावणीवेळी मुख्य न्यायाधीश अभय ओक यांच्या विभागीय खंडपीठाने हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे सोपविण्यास नकार दिला.
Previous Articleकाँग्रेस नेत्यांचा ‘राजभवन चलो’ मोर्चा
Next Article कर्नाटक भू-अतिक्रमण निषेध कायदा योग्यच
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.