नवी दिल्ली
स्टर्लिंग ऍण्ड विल्सन सोलार कंपनीने ओमानमध्ये 25 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प चालू केला असल्याची माहिती शेअर बाजाराला दिली आहे. स्टर्लिंगकडून ओमानमध्ये दुसऱया प्रकल्पाची यशस्वीपणे सुरुवात करण्यात आली आहे. 25 मेगावॅटच्या प्रकल्पाला जागतिक ऊर्जा कंपनी शेलने एसडब्लूएसएलला दिले होते. एसडब्लूएसएलचे संचालक आणि जागतिक सीईओ बिकेश ओगरा यांनी ही माहिती दिली आहे.