प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्टसिटी अंर्तगत शहरातील विविध भागात विकास साधण्यात येत आहे. शहरातील रस्ते, डेनेज वाहिन्या, सीडीवर्कच्या कामांचा विकास होत आहे. मात्र या कामांमुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडालेला पहायला मिळत आहे. सतत गजबजणाऱया व शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱया खडेबाजार प्रवेशद्वाराजवळ सीडीवर्कचे काम हाती घेण्यात आल्याने रहदारीचे तीन-तेरा वाजले आहेत.
खडेबाजार प्रवेशद्वाराजवळ स्मार्ट सिटीअंतर्गत सीडीवर्कच्या कामांसाठी खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात येणारी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी सीडीवर्कच्या कामासाठी चर काढण्यात आली आहे. मात्र काम जलदगतीने होत नसल्याने वाहनधारकांसह पादचाऱयांचे हाल होताना दिसत आहेत.
उत्तर भागातील नागरिक सर्रास खडेबाजार मार्गावरून शहरात प्रवेश करतात. तसेच या मार्गाच्या दुतर्फा फेरीवाले बसलेले असतात. शिवाय परिसरात दुकाने, आस्थापने असल्याने नागरिकांची नेहमी वर्दळ असते. मात्र प्रवेशद्वाराजवळ खोदाई करण्यात आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. केवळ पादचाऱयांची गैरसोय टाळण्यासाठी फळय़ा घालून व्यवस्था करण्यात आली आहे.
या फळय़ांवरून पादचाऱयांची ये-जा सुरू असली तरी या फळय़ा अपुऱया पडत असल्याने पादचाऱयांना कसरत करत मार्ग ओलांडावा लागत आहे. या मार्गावर पादचाऱयांची संख्या अधिक असल्याने फळय़ांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे. नागरिकांना कसरत करत ये-जा करावी लागत असल्याने गैरसोय होत असून संबंधित काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
काम लवकर पूर्ण करा…
शहराच्या उत्तर भागातील जनता शहरात येण्यासाठी या मार्गाचा अवलंब करते. त्यामुळे या मार्गावर नेहमी पादचाऱयांची गर्दी असते. तसेच शेजारी मध्यवर्ती बसस्थानक असल्याने प्रवाशांची वर्दळ देखील असते. नेहमी गजबजणाऱया मार्गावर सीडीवर्कच्या कामासाठी खोदाई करण्यात आल्याने वाहतूक बंद झाली आहे. परिणामी सिग्नलजवळ वाहतूक कोंडी देखील निर्माण होत आहे. खोदाई करण्यात आलेल्या चरीवर पादचाऱयांसाठी फळय़ा टाकण्यात आल्या आहेत. मात्र त्या देखील अपुऱया पडत असल्याने धोका पत्करून पादचाऱयांची ये-जा सुरू आहे. त्यामुळे तातडीने सीडीवर्कचे काम पूर्ण करून मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.