वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्यावतीने बिडी येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. बिडी येथील सदर आरोग्य केंद्र या भागातील जनतेला वरदान ठरले आहे. परंतु या आरोग्य केंद्राच्या परिसरात झुडपे वाढली होती. तसेच परिसर प्रदूषित झाला होता. याची दखल घेऊन युवा मोर्चा अध्यक्ष दर्शन किल्लारी तसेच जिल्हा मोर्चा जनरल सेपेटरी सुनील मड्डीमनी यांच्या नेतृत्वाखाली सदर अभियान राबविण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष संतोष हडपद, सुनील कोगी, मारुती उमनगोळ, रुद्राप्पा गौडर, बाळू अक्षीमणी, अभिलाष बाळेकुंद्री, नागराज निंबाजी, प्रसाद मुंदीनमनी आदी भाजप कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.