नवी दिल्ली
अदानी एंटरप्रायझेसला चालू आर्थिक वर्षात एकत्रित निव्वळ नफ्यात घसरण अनुभवायला मिळाली आहे. डिसेंबरला संपलेल्या तिसऱया तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 10 टक्के घटून 343.17 कोटी रुपयांवर पोहचला आहे. मागच्या वर्षी समान कालावधीत हा नफा 382.98 कोटी रुपये इतका होता. प्रसिद्ध उद्योगपती आणि अदानीचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी बुधवारी कंपनीच्या नफ्यासंबंधीची माहिती शेअरबाजाराला दिली. तिमाहीदरम्यान कंपनीचे एकत्रित एकूण उत्पन्न वाढून 11 हजार 787.82 कोटी रुपयांवर पोहचलं. जे मागच्या वर्षी समान कालावधीत 11 हजार 75.32 कोटी रुपये होते. तर कंपनीचा एकूण खर्च वाढून 11 हजार 303.97 कोटींवर पोहचला आहे.