ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज वाशी कोर्टात हजर राहणार आहेत. 26 जानेवारी 2014 रोजी राज ठाकरे यांनी वाशी येथे केलेल्या भाषणात टोल नाके बंद करण्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे आणि मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका इथे तोडफोड केली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी राज ठाकरे हे वाशी कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. राज ठाकरे हे कोर्टात हजर राहीले नसल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले होते.
आज सकाळी 10 ते 10.30 दरम्यान राज ठाकरे वाशी टोल नाका इथे पोहचणार आहेत. त्यानंतर 11 पर्यंत राज ठाकरे हे वाशी कोर्टात हजर राहणार आहेत. दरम्यान, यासाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच चार ते पाच हजार कार्यकर्ते कोर्टाच्या आवारात उपस्थित राहणार आहेत.