प्रतिनिधी / बेळगाव
फेसबुक प्रेंड्स सर्कलच्यावतीने केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या यल्लापूर येथील एका रुग्णाला तातडीने ए. व्ही. पॉझिटिव्ह रक्त उपलब्ध करून देण्यात आले. मुंदगोड येथील बसप्पा कुलिगोड हे मुंदगोडहून यल्लापूरला कार्यालयाला जात असताना त्यांचा अपघात झाला. त्यांच्या उजव्या पायाला जबर इजा झाली असून, हातालाही मार बसला आहे. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. त्यामुळे त्यांना केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मात्र त्यासाठी रक्ताची गरज असल्याचे फेसबुक प्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांना समजले. त्यांच्यासह वैभवी नाईक, रॉबर्ट नरोना, शांतकुमार गौडा, बाबू नायकर, रवि ओसापाचे यांनी त्वरित रक्तदान करून रुग्णाला साहाय्य केले