प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणूंवर मात करण्यासाठी आरोग्य खात्याच्यावतीने कोरोना योद्धय़ांना लस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य खात्यातील अधिकारी व कर्मचाऱयांना लस देण्यात आली. त्या पाठोपाठ आता महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱयांसह कार्यालयीन कर्मचाऱयांना लस देण्यास प्रारंभ करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली.
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी लस वितरित करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धय़ांना लस देण्यास प्राधान्य देण्यात आले. विशेषतः आरोग्य सेवा बजावणाऱया अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना लस वितरित करण्यात आली. दुसऱया टप्प्यात स्वच्छता कामगार व कार्यालयीन कर्मचाऱयांना लस देण्यास प्रारंभ ^झाला आहे. महापालिकेच्या स्वच्छता कामगारांची यादी आरोग्य खात्याला देण्यात आली होती. पण कार्यालयीन कामगारांची यादी देण्यात आली नाही. मात्र, सर्वांनाच लस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या स्वच्छता कामगारांना लस देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. लस घेतल्यानंतर दुष्परिणाम होतील, असा गैरसमज स्वच्छता कामगारांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे काही कामगार लस घेण्यास घाबरत आहेत. त्यामुळे कामगार लस घेण्यास नकार देत आहेत. पण त्यांना लसीबाबतचे गैरसमज दूर करून लस देण्यात येत आहे. महापालिकेच्या कार्यालयीन अधिकाऱयांनाही लस घेणे बंधनकारक आहे. शनिवारपासून कार्यालयीन कर्मचाऱयांना व अधिकाऱयांना लस देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. डुमगोळ यांनी दिली.