ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी :
मेक्सिकोत कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केल्याने तेथे 25 मार्चपर्यंत कोरोना निर्बंध वाढविण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार कामशिवाय आता कोणालाही प्रवास करता येणार नाही. दरम्यान, या देशात आतापर्यंत 20 लाख 38 हजार 276 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 79 हजार 797 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
वर्ल्डोमीटरनुसार, शनिवारी या देशात 07 हजार 829 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 857 जणांचा मृत्यू झाला. 20.38 लाख रुग्णांपैकी 15 लाख 90 हजार 696 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2 लाख 67 हजार 783 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 4798 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिको जगात तेराव्या क्रमांकावर आहे. तर कोरोनाबळींच्या संख्येत या देशाचा चौथा क्रमांक लागतो. येथे आतापर्यंत 52 लाख 66 हजार 415 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.