प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात आज बुधवारी ११ जण कोरोना बाधित असल्याचा अहवाल तालुका आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला असून टेंभुर्णी, निमगांव टें, तुळशी ,उजनी मा. येथे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
तालुक्यात एकूण १८४ पैकी ८८ जणांची अॅन्टीजन टेस्ट तर ९६ जणांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. त्यापैकी आज टेंभुर्णी येथे ८, निमगांव टें येथे १, तुळशी येथे १, उजनी मा येथे १ असे एकूण ११ जण कोरोना बाधित आढळले आहेत. दोघा जणांची प्रकृती ठिक असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.एकाच वेळी टेंभुर्णीत ८ रुग्ण आढळ्याने चिंतेची बाब आहे. तरी नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. बाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा, हाथ स्वच्छ धुवावेत, सॅनीटायझरचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.