दोहा : कतार आपल्या देशातील कामगारांच्या कायद्यांमध्ये पुन्हा एकदा मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. ज्यामध्ये कतारच्या शुरा कौन्सिलने सरकारला लेबर लॉ मध्ये बदल करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. जर का हे नवीन कायदे लागू केले तर जगभरातील जवळपास 26 लाख कामगारांच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचे संकेत आहेत. नैसर्गिक गॅसचा सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून कतारची ओळख असून या क्षेत्रात काम करणाऱयात जवळपास 10 लाख भारतीय असल्याची माहिती आहे. मागील वर्षात कतारने कामगार कायद्यात सुधारणा केली होती, परंतु शुरा कौन्सिलच्या शिफारशी मान्य केल्या तर मागील सुधारणा आपोआपच रद्द होण्याची शक्यता दाट आहे. बीबीसीच्या अहवालानुसार कतारची शुरा कौन्सिलने आपल्या शिफारशीमध्ये प्रवासी कामगारांना तीन वेळाच कंपनी बदलण्यास परवानगी द्यावी असे म्हटले आहे. मागील वर्षात लागू केलेल्या सुधारणांमध्ये ही संख्या निश्चित केली नव्हती. सदरच्या बदलामुळे आगामी काळात कतारमधील कंपन्यांची शक्ती वाढण्यास मदत होणार असल्याची शक्यता आहे. शुरा कौन्सिल एक सल्लागार परिषद असून जी वेगवेगळय़ा प्रकरणांमध्ये सरकारला आपला सल्ला देण्याचे काम करत असते.
Previous Articleलीगमधील अव्वल स्थानासाठी आज मुंबई-एटीके आमनेसामने
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.