प्रतिनिधी / कुडचडे
कुडचडे-काकोडा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्र. 15 साठी माजी नगरसेविका रुचा वस्त यांनी परत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला असून सोमवारी दि. 1 मार्च रोजी आपला उमेदवारी अर्ज केपेच्या उपजिल्हाधिकाऱयाकडे सुपूर्द केला. आपल्या प्रभागात एकूण 1096 मतदार आहेत. आपण परत निवडणुकीत उतरण्याचे एकच हेतू असून आपल्या प्रभागाचा अधिक विकास करणे आहे. त्याच बरोबर महिलासाठी सोयीस्कर व त्यातून मिळकत मिळू शकेल या दृष्टीने कार्य करण्याचा विचार आहे अशी माहिती उमेदवार रुचा वस्त यांनी दिली आहे.