लोखंडी वस्तूंमुळे लाकडाची मागणी घटली, व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर
प्रतिनिधी / व्हनाळी
ट्रॅक्टरने पेरणी शेतीची सर्वच कामे ट्रॅक्टरच्या साह्याने होऊ लागल्याने शेतकरी वापरत असलेली, नांगरी, कुळव, व्होलपाटा, बांडगे, तिकाटणे, कुरी, फटी, अशी सर्वच लाकडी अवजारे व लाकडी बैलगाडी आजमितीला इतिहासात जमा होऊ लागली आहेत. याशिवाय ताक ढवळण्यासाठी लागणारी लाकडी, रवी घराघरांत दिसणाऱ्या लाकडी वस्तू ही गायब झाल्या असून त्यांची जागा लोखंडी, स्टील, प्लास्टीकच्या वस्तूंनी घेतल्या आहेत. त्यामुळे लाकडांना हवा तसा आकार देऊन मागेल ती वस्तू बनवून देणाऱ्या सुतारकाम व्यवसायालाही आता उतरती कळा लागली आहे.
पुर्वीच्या घरातील, माडीचा जीना, कडीपाट, उतरंग, तुळ्या, गलत्याची नक्षीदार चैाकट, खुट्या, फळ्यांची किलची, लाकडी वासे,आदी वस्तुंपासून सुतार कारागीरांच्या कलाकुसरीतून साकरलेली कांही जुनी घरेच आज पहायाला मिळत आहेत.शिवाय आता ह्या घरांच्या बांधणीची कल्पनाच लुप्त होत चालली असल्यामुळे पूर्वीपासून चालत असलेला सुतार काम व्यवसाय आता अडचणीत आला आहे. बैत्यावर सुतार काम पद्धत बंद होवून त्या मजूरीचे रोख पैसे सुतार कारागिरांना शेतकरी देवून यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. पण सध्या शेतीतील बैलाचे औत बंद होवून त्याजागी ट्रॅक्टर आल्याने शेतीसाठी नेहमी वापरात असलेली लाकडी वस्तूंची औजारे बंद झाल्याने त्याठिकाणी लोंखडी वस्तूंचा वापर जास्त प्रणात झाल्याने लाकडी औजारे बनविणारा सुतार कारागिरांचा सुतारकाम व्यवसाय आडचणीत आला आहे.
पर्यायांचा आशेचा किरण ….
पुर्वी पासून चालत आलेला हा सुतार काम व्यवसाय लोखंडी औजारे, वस्तूंच्या वापरामुळे आडचणीत आला आहे. पण काही मोजक्याच सुतार कलाकारांनी व्यवसाय बंद झाल्याने हाताश न होता. लाकडी गाडी, जहाज, रथ, ट्रॅक्टर, खेळणी आदी शोभेच्या वस्तू बनवून आपल्या व्यवसायाला गती देण्याचे काम सुरू केल्याने जीवन जगण्यासाठी त्याचा हातभार लागत आहे.
जातीला नशीबाची साथ नाही…
शाळा कमी शिकल्याने नोकरीही मिळत नव्हती तर अनेकांनी आपला वडिलार्जीत सुतार-लोहार काम हा व्यवसाय पुढेही चालूच ठेवला आहे. आशा सुतार लोहार समाज्याच्या पुढची पिढी ह्या व्यवसात न येता इतर व्यवसायात किंवा नोकरीत स्थिर व्हावी अशी अपेक्षा आहे. पण काही मुलांची शाळेतील दाखल्याच्या जातीची नोंदणी हिंदू-सुतार अशी होण्याएैवजी हिंदू मराठा लागल्याने काही शासकीय लाभापासूनही वंचीत रहावे लागत आहे. त्यामुळे मुळचा सुतार-लोहार असा दाखल्यावर उल्लेख असणा-या या समाजातील कलाकारांच्या मुलांना शाकसीय सेवा सुविधा देण्याचा शासनस्तरावर निर्णय व्हावा अशी मागणी सुतार – लोहार व्यावसायिकांतून होत आहे.
शासनाने कारागिरांना मानधन द्यावे ….
लोखंडी अवजारे तयार झाल्याने सुतार कामे बंद झाली आहेत. आज तागायत दरवाजे, खिडक्या, नांगर, तिफन, कोळपे बनविले. आजही बनवतो. मात्र लोकांचा कल लोखंडी अवजाराकडे वळत असल्याने हाताला काम नाही. कालबाह्य होत चाललेल्या कलेला शासनाने राजाश्रय देऊन सुतार – लोहार व्यवसायिकांना मानधनाची सोय करावी पांडूरंग सुतार ,साके ता कागल