सर्वसाधारणपणे बहुतांश देशांमध्ये तुरुंगांच्या क्षमतेपेक्षा अधिक कैदी तेथे डांबण्यात येत असल्याचे कानावर पडते, पण नेदरलँडमध्ये आता बहुतांश तुरुंग रिकामी राहतात. तेथील गुन्हय़ांचे प्रमाण प्रचंड खालावलेले आहे. याचमुळे तेथील बहुतेक मोठय़ा तुरुंगांना आलिशान हॉटेल्समध्ये रुपांतरित करण्यात आले आहे.
जगभरात बहुतांश तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी डांबण्यात आले आहेत. तर अनेक देशांमध्ये गुन्हय़ांचे प्रमाण अधिक असल्याने तुरुंगातील कैद्यांची संख्या निश्चित प्रमाणापेक्षा कितीतरी वाढत आहे. अमेरिका आणि भारतासह दक्षिण अमेरिकन देशांमधील तुरुंग ओव्हरक्राउड झाल्याचे बोलले जाते. पण नेदरलँड या देशात गुन्हेगारी जवळपास संपुष्टात आली आहे. गुन्हय़ांचे प्रमाण नसल्यातच जमा आहे. याचमुळे आता तेथील मोठय़ा तुरुंगांना कार्यालये किंवा हॉटेल्समध्ये रुपांतरित करण्यात येत आहे.
मागील 10 वर्षांमध्ये नेदरलँडमध्ये सर्वाधिक कमी गुन्हे झाले आहेत. गुन्हय़ाचे प्रमाण 8 वर्षांमध्ये 25 टक्क्यांनी कमी झाले आहे. देशभरातील पोलीस स्थानक कमी करण्यात आल्याने गुन्हय़ांचा दर कमी झाल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.
आरामदायी वास्तव्य
रिकामी राहिलेल्या तुरुंगांच्या काही इमारतींमध्ये सीरियाच्या शरणार्थींना ठेवण्यात आले. ऍमस्टरडॅमच्या बाहेरील अशाच एका तुरुंगाला द हेड अर्साइथिस नावाच्या हॉटेलमध्ये बदलण्यात आले आहे. यात पाहुण्यांना ज्या खोल्यांमध्ये आरामदायी वास्तव्याची सुविधा मिळते, तेथे कधीकाळी कैदी ठेवले जात होते. पण पूर्ण इमारतीचा केलेला कायापालट पाहता तेथे कधीकाळी तुरुंग होता याची जाणीवच होत नाही.
आलिशाइन सूइट
तेथे पाहुण्यांसाठी चार सूइटला अपग्रेड करून आलिशान स्वरुप देण्यात आले ओत. द जेलर, द लायर, द डायरेक्टर आणि द जज अशी त्यांना नावे देण्यात आली आहेत. या हॉटेलच प्रत्येक खोलीत वाय-फाय, फ्लॅट स्क्रीन टीव्ही आणि अन्य सुविधा आहेत. हॉटेलमध्ये एक उत्तम रेस्टॉरंट आहे. पाहुण्यांसाठी फिटनेस सेंटर आणि सोनाबाथची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.