मालामाल होण्यासाठी लोकांची गर्दी
मध्य आफ्रिकेच्या काँगोमध्ये 60 ते 90 टक्के हिस्स्यात सोने असलेल्या पर्वताचा शोध लागला आहे. स्थानिक लोकांना याची माहिती मिळाल्यावर हजारो ग्रामस्थ सोने प्राप्त करण्यासाठी तेथे धावले आहेत. काँगोच्या पर्वतामधून सोन्याचे उत्खनन करतानाची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. सोन्याने भरलेला एक पर्वत मिळाल्यावर काँगोच्या एका गावातील लोक आश्चर्यचकित असल्याचे एका पत्रकाराने नमूद केले आहे.
सोन्याचा पर्वत मिळण्याची ही घटना काँगोच्या किवू प्रांतातील आहे. मोठी गर्दी लोटल्यावर खाणकामावर काही काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. काँगोमध्ये सोन्याचे उत्खनन सर्वसामान्य बाब आहे. देशाच्या अनेक हिस्स्यांमध्ये सोन्याचे साठे आहेत.
काँगोमधील सोन्याच्या उत्खननाची खरी आकडेवारी कधीच समोर येत नाही. काँगोच्या शेजारी देशांच्या मदतीने मोठय़ा प्रमाणात सोन्याची तस्करी करण्यात येते.