वार्ताहर / किणये
कुदेमानी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर कमिटी व ग्रामस्थांतर्फे आयोजित बैलगाडा पळविण्याच्या शर्यतीमध्ये बेटगिरी येथील बेनकाई देवी प्रसन्न या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळविला. तर वाघवडे येथील चव्हाटा प्रसन्न या बैलजोडीने द्वितीय क्रमांक मिळविला.
कुदेमानी गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या सभामंडपाच्या उभारणीसाठी या शर्यतीचे आयोजन केले होते. तीन दिवस या शर्यती रंगल्या होत्या. शर्यतीसाठी 31 हजार, 25 हजार, 22 हजार, 20 हजार, 18 हजार, 16 हजार, 14 हजार, 12 हजार, 11 हजार, 10 हजार, 9 हजार, 8 हजार, 7 हजार, 6 हजार अशी पंधरा आकर्षक बक्षिसे होती. तसेच 21 वे लकी नंबर बक्षीस 4 हजार रुपयांचे होते.
शर्यत उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त बीएसएनएल कर्मचारी विष्णू जांबोटकर होते. बैलगाडीचे पूजन माजी आमदार संजय पाटील यांनी केले. त्यानंतर विविध प्रतिमांचे पूजन विविध मान्यवरांनी केले.
ग्राम पंचायत अध्यक्षा रेणुका नाईक, सदस्या आरती लोहार, डॉ. वंदना गुरव, रुपाली पाटील, माजी ग्रा. पं. अध्यक्षा असीता सुतार, शामला गुरव, विद्या गुरव, रुक्मिणी पाटील आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पश्चिम भागातील विविध ग्राम पंचायतींच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कुदेमानी ग्रा. पं. अध्यक्षांसह सदस्य तसेच बेळगुंदी ग्रा. पं. अध्यक्षा हेमा हदगल व इतरांचा सत्कार करण्यात आला.
शर्यतीमध्ये तृतीय क्रमांक कागणी येथील ज्योतिर्लिंग प्रसन्न या बैलजोडीने पटकाविला. चौथा महादेव प्रसन्न सरोळी, पाचवा रवळनाथ-कलमेश्वर प्रसन्न बेळगुंदी, सहावा लक्ष्मी प्रसन्न कुंदरगी, सातवा पुरमार प्रसन्न धामणे, आठवा जयहनुमान प्रसन्न डुक्करवाडी, नववा शिवाजी कणबरकर मुतगा, दहावा नागनाथ प्रसन्न बेकिनकेरे, अकरावा हुलवीर देव अर्जुनवाडी, बारावा चव्हाटा प्रसन्न वाघवडे, तेरावा मळेकरणी प्रसन्न उचगाव, चौदावा बेनकाई प्रसन्न बेटगिरी, पंधरावा मरगुबाई प्रसन्न तुर्केवाडी आदींनी मिळविले. तसेच 21 वा लकी नंबर रामलिंग प्रसन्न तडशीनहाळ येथील बैलजोडीला मिळाला.
नागेश राजगोळकर, विष्णू जांबोटकर, शांताराम पाटील, शिवाजी मुरकुटे, हेमंत पाटील, मारुती पाटील, ईश्वर गुरव, अर्जुन जांबोटकर, गणपत धामणेकर, रतन पाटील, राजू धामणेकर, मंदिर कमिटीचे अध्यक्ष परशराम पाटील आदींच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन शिक्षक जी. जी. पाटील व नागेश राजगोळकर यांनी केले.