आलिया भट्टने सोमवारी 15 मार्च रोजी स्वतःच्या जन्मदिनी ‘सीते’च्या रुपातील स्वतःचा फर्स्ट लुक प्रसारित केला आहे. एस.एस. राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटात आलिया सीतेच्या भूमिकेत दिसुन येणार आहे. गंगूबाई काठियावाडीनंतर आलियाच्या या अवतारला पाहून चाहते अत्यंत उत्साहित आहेत. या चित्रपटात आलियासह ज्युनियर एनटीआर, रामचरण आणि अजय देवगणही असणार आहे. राजामौली यांचा चित्रपट 13 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
मंदिरात उभ्या सीतेची झलक
आरआरआरमध्ये सीता झालेल्या आलियाचे एक छायाचित्र प्रसारित करण्यात आले आहे. यात ती मंदिरासमोर उभी असल्याचे दिसून येते. हा चित्रपट 1920 च्या दशकातील स्वातंत्र्यलढय़ातील घटनाक्रमांवर आधारित आहे. चित्रपटात तेलगू आदिवासी नेते अल्लुरी सीताराम राजू यांची कथा दाखविण्यात येणार आहे. चित्रपटात रामचरण मुख्य भूमिकेत तर ज्युनियर एनटीआर ‘भीम’च्या व्यक्तिरेखेत दिसून येणार आहे.