चार दिवस बँका बंदमुळे कांही एटीएममध्ये खडखडाट
प्रतिनिधी / कोल्हापूर
बँक खाजगीकरणाच्या विरोधात सोमवारपासून दोन दिवशीचा देशव्यापी संप पुकारला आहे. मंगळवारी सुध्दा बँका बंद राहील्याने, या दोन दिवसात जिल्हयातील आर्थिक व्यवहाराबरोबर क्लिअरींगसह 1600 कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. बँकांनी देशव्यापी संप पुकारल्याने, बँक ग्राहकांना एटीएमचा आधार घ्यावा लागला. या चार दिवसाच्या बँक बंदमुळे शहरातील कांही एटीएममध्ये खडखडाट झाला असल्याचे बँक सूत्राकडून सांगण्यात आले. सलग चार दिवसाच्या बंदनंतर बुधवारी बँकामध्ये मोठी गर्दी होणार आहे.
या संपामुळे जिल्हयातील विविध बँकांच्या 300 शाखेमधून पाच हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. या दोन दिवशीय देशव्यापी संपामध्ये 12 सार्वजनिक क्षेत्रातील, 12 जुन्या जमान्यातील खाजगी, सहा विदेशी, 56 प्रादेशिक ग्रामीण बँकेतील दहा लाखांवर बँक कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले आहेत. मात्र या संपामध्ये शेडयुल्ड व नागरी सहकारी बँकाचा समावेश नाही.
महामारीच्या पार्श्वभूमीवर निदर्शने, धरणे आदी न करता पत्रके वाटप, सोशल मिडीयावरून खाजगी धोरणाविरोधात हा संदेश सर्वत्र पोचवण्याचे काम बॅक कर्मंचाऱयाकडून करण्यात आले आहे. मंगळवारी लक्ष्मीपुरी येथील बँक ऑफ इंडिया शाखेसमारे मूक निदर्शने करून, देशव्यापी बंदची पत्रके वाटप करण्यात आली. .या संपात बँकेत काम करणारे सफाई कर्मचारी ते शाखा व्यवस्थापक सर्व श्रेणीतील अधिकारी सहभागी झाले आहेत.
जिल्हयाच्या संपाचे नेतृत्व युनायटेड फोरम ऑफ बँक युनिययन्स कोल्हापूरचे ,कॉ. विकास देसाई,सुहास शेंदे,रमेश कांबळे,प्रमोद शिंदे,सुर्यकांत कर्णिक,तेजस्वीनी पाटील,विवेक कुमार,पांडूरंग वायदंडे आदीनी केले आहे.
काही एटीएममध्ये खडखडाट
गुरूवारी महाशिवरात्रीची बँकेला सुट्टी होती. शुक्रवारी फक्त बँक सुरू होती. दुसऱया शनिवारी तर रविवारची आठवडी सुट्टी.सोमवार व मंगळवारी संप.सलग चार दिवसाच्या बँक बंदमुळे व्यापाऱयासह बँक ग्राहकांची मोठी पुंचबना झाली होती.सलग चार दिवसाच्या बंदमुळे शहरातील कांही एटीएममध्ये खडखडाट झाला असल्याचे कांही बँक सूत्राकारडून सांगण्यात आले.