प्रतिनिधी / मडगाव
पेड -मडगाव येथे दोघांवर मंगळवारी सायंकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोघेजण जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार वार्का येथील एका जमिनीच्या प्रकरणातून हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. मंगळवारी वार्का येथे एका जमिनीसंबंधी सरकारी अधिकारी पाहणी करण्यासाठी येणार होते. यावेळी तेथे बाचाबाची झाली होती. आणि त्यानंतर हल्लेखोरांनी पाठलाग करुन पेड -मडगाव येथे हा हल्ला केला.
जखमीपैकी एकाचे नाव बेनी असून तो वार्का येथील आहे. स्थानिकांचे म्हणणे असे की हल्लेखोर हे परप्रांतिय असून पोलिसांनी हल्लेखोरोविरुद्ध कडक कारवाई करावी.