वृत्तसंस्था/ ऍकापुल्को
रोहन बोपण्णा व ऐसाम उल कुरेशी या इंडो-पाक जोडीला पुन्हा एकत्र आल्यानंतर पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. येथे सुरू असलेल्या एटीपी 500 स्पर्धेत त्यांना द्वितीय मानांकित ब्रुनो सोआरेस व जेमी मरे यांच्याकडून हार पत्करावी लागली.
सोआरेस-मरे यांनी या बिगरमानांकित इंडो-पाक जोडीवर 7-6 (7-4), 2-6, 1-10 अशी मात केली. सुपर टायब्रेकरमध्ये 0-7 असे पिछाडीवर पडल्यानंतर त्यांना मुसंडी मारणे अशक्य झाले होते. बोपण्णा व कुरेशी यांनी 2014 मध्ये शेनझेन येथे झालेल्या एटीपी स्पर्धेत शेवटचे एकत्र खेळले होते. त्यांनी फक्त या स्पर्धेपुरतेच एकत्र खेळणार असल्याचे याआधीच जाहीर केले होते. त्यामुळे त्यांचे एकत्र खेळणे अगदीच अल्पजीवी ठरले. दोघांचेही मानांकन खूप खालचे असल्याने त्यांना मोठय़ा स्पर्धेत प्रवेश मिळणार नसल्यामुळे त्यांनी फक्त एकाच स्पर्धेत एकत्र खेळण्याचा निर्णय घेतला होता.