मुला-मुलीकडील नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात जमाव : संबधित मुला-मुलीचे प्रेमसंबध
प्रतिनिधी / रत्नागिरी
अल्पवयीन तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी तरुणास बुधवारी अटक केल्यामुळे मुली- मुलाकडील नातेवाईकानी जयगड पोलिस ठाण्यात जमाव केला या प्रकारामुळे जयगड पोलिस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले
अल्पवयीन मुलगी व संशयिताचे प्रेम संबंध गेल्या काही दिवसापासून सुरु होत़े मंगळवारी 16 रोजी रात्री संशयित तरुणाने मुलीला रस्त्यावर बोलावले व दोघेही बराच वेळ घराबाहेर होती .या संधीचा फायदा घेत तरुणाने तिच्याशी मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले . बराच वेळ मुलगी घरात आली नाही म्हणून तिच्या वडीलांनी कुटुंबाला धारेवर धरले होते . त्यानंतर ती मुलगी घरी आल्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला . या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली . तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्या प्रकरणी भादवी कलम 354 तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा ( पॉक्सो ) अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
संबधित संशयित तरुणास पोलिसांनी अटक केल्यामुळे जयगड पोलिस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होत़े मुली- मुलाकडील नातेवाईकानी बुधवारी जयगड पोलिस ठाण्यात मोठय़ा प्रमाणात जमाव केल़ा याप्रकरणी अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत .
अल्पवयीन मुलीशी मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना घडली आहे . . ही घटना मंगळवारी ( ता . 16 ) रात्रीच्या सुमारास घडली .