वार्ताहर / यड्राव
दुध आणण्यासाठी चालत निघालेल्या युवकाचा मोटारसायकलच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. सुशांत दिनकर टिबुगडे वय 27, रा. मलाबादे नगर शहापूर असेमयत झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मोटरसायकलस्वार सचिन संजय सांगावकर वय 24 रा. कोरोची याच्याविरोधात शहाजी रमेश भोसले यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या विषया मिळालेली माहिती अशी कि, सुशांत हा पंचगंगा साखर कारखाना तेमलाबादे नगर या मार्गावरून दूध आणण्यासाठी जात असतानायड्रावहून कोरोचीकडे निघालेल्या मोटारसायकलस्वार सचिन सांगावकर हा आपली स्प्लेंडर घेऊन निघाला होता. रस्त्यावर मळी सांडल्याने त्यातच तुरळक पाऊस पडल्याने रस्त्यावरूनमोटरसायकलघसरून सुशांत टिबुगडे याला पाठीमागून जोराची धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती कि त्यामध्ये सुशांतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातमध्ये सुशांत जागीच ठार झाला. त्याच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.