गेल्या 24 तासात 189 नवे रुग्ण, 1 बळी : राजधानी पणजीसह पर्वरीत मोठा धोका : सामाजिक अंतर, मास्क बनला अत्त्यावश्यक
प्रतिनिधी / पणजी
गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येचा आलेख वाढताच राहिला असून गुरुवारी चक्क 189 जणांची भर पडली आहे. त्याद्वारे सक्रीय रुग्णसंख्या 1278 एवढी झाली आहे. गेल्या 24 तासात एकाचा बळी गेला असून आतापर्यंतच्या एकूण मृतांची संख्या 822 वर पोहोचली आहे.
आतापर्यंत एकूण 57170 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 55070 जण बरे झाले. सध्या संशयित रुग्ण म्हणून 20 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले तर 70 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. 24 तासात 66 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या विविध आरोग्य केंद्रात उपचार घेणाऱया रुग्णात सर्वाधिक 163 रुग्ण पणजी केंद्रात आहेत. त्या खालोखाल मडगाव व फोंडा केंद्रात प्रत्येकी 119 तर पर्वरी केंद्रात 114 रुग्ण आहेत. कांदोळीत 91, वास्को 85, म्हापसात 64, कुठ्ठाळी 58, कासावलीत 54, शिवोली 52, चिंबलमध्ये 49 रुग्ण आहेत. अन्य सर्वत्र 30 पेक्षा कमी रुग्ण आहेत.
सक्रीय रुग्णांची केंद्रवार संख्या पुढीलप्रमाणे आहेः डिचोली 13, सांखळी 14, पेडणे 27, वाळपई 09, म्हापसा 64, पणजी 163, हळदोणा 17, बेतकी 11, कांदोळी 91, कासारवर्णे 02, कोलवाळ 11, खोर्ली 28, चिंबल 49, शिवोली 52, पर्वरी 114, मये 05, कुडचडे 12, काणकोण 13, मडगाव 119, वास्को 85, बाळ्ळी 17, कासावली 54, चिंचिणी 31, कुठ्ठाळी 53, कुडतरी 13, लोटली 17, मडकई 13, केपे 14, सांगे 05, शिरोडा 01, धारबांदोडा 15, फोंडा 119, नावेली 21. त्याशिवाय हवाईमार्गे आलेला 01 प्रवाशी बाधित सापडला आहे.
- 25 मार्चपर्यंतचे एकूण रुग्ण 57170
- 25 मार्चपर्यंतचे बरे झालेले रुग्ण 55070
- 25 मार्चपर्यंतचे सक्रिय रुग्ण 1278
- 25 मार्च रोजीचे नवे रुग्ण 189
- 25 मार्च रोजी बरे झालेले रुग्ण 66
- 25 मार्च रोजीचा बळी 01
- आतापर्यंतचे एकूण बळी 822
पर्वरीत मधुबन प्रकल्प ‘मायक्रो कंटेनमेंट झोन’
कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पर्वरीतील सालय, साल्वादोर द मुन्दू येथील ’मधुबन कॉम्प्लेक्स’ परिसर मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय, आयएएस यांनी तसा आदेश जारी केला आहे.
’द गोवा ऍपिडेमिक डिसीज कोविड-19 रेग्युलेशन 2020’ नुसार जिल्हाधिकाऱयांनी ही कारवाई केली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सदर प्रकल्पाच्या परिसरात राहणाऱया बाधित तसेच संशयित नागरिकांची क्रिनिंग, तपासणी, सेनिटायझेशन, क्वारंटाईन, आयसोलेशन, सामाजिक अंतर आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अन्य उपाययोजना घेण्यात येणार आहेत.
त्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीम नियुक्त करण्यात आली आहे. त्यात बार्देश तालुका उपजिल्हाधिकारी, पर्वरीचे पोलीस उपअधीक्षक, पर्वरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, साल्वादोर द मुन्दू ग्रामपंचायतीचे सचिव, पर्वरी अग्निशामक दलाचे स्टेशन अधिकारी, बार्देश तालुक्याचे संयुक्त मामलेदार -4, नागरी पुरवठा खात्याचे बार्देश तालुका निरीक्षक, बार्देश साबांखाचे (इमारत) सहाय्यक अभियंता यांचा समावेश करण्यात आला आहे.
सदर मायक्रो कंटेनमेंट परिसरात प्रवेश करण्यास किंवा फिरण्यास सर्वसामान्य नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. केवळ आरोग्य कर्मचारी आणि दैनंदिन अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा करणाऱयांना प्रवेश देण्यात येणार आहे. सध्या संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
वरील कालावधीत कोणतीही आपत्कालीन गरज निर्माण झाल्यास शैलेंद्र देसाई, संयुक्त मामलेदार -4 बार्देश (मो. 9049468580), राजाराम परब, संयुक्त मामलेदार -3 बार्देश (मो. 9823215447) किंवा अनिल राणे सरदेसाई, संयुक्त मामलेदार -2 बार्देश (मो. 9423811321) यांच्याशी संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.