बेंगळूर : सर्व मागासवर्गीय समुदायांच्या विकासासाठी राज्यातील भाजप सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केले. दावणगेरे जिल्हय़ाच्या बेळ्ळोडी येथे बांधलेल्या नूतन विद्यार्थी निलय, समुदाय भवन आणि मुख्य महाद्वाराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सर्व समुदायांच्या विकासासाठी सरकारने विविध योजना आखल्या असून आरक्षणाचे प्रमाण 50 टक्क्यापेक्षा अधिक वाढविण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. हालुमत समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याबाबत कुलशास्त्रींच्या अध्ययनाचा अभ्यासासाठी उच्चस्तरिय समितीची रचना करण्यात आली आहे. लकवरच याचा अहवाल मिळणार आहे. याचबरोबर एक लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारांचा मोठय़ा मतांच्या अंतराने विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Trending
- श्रीबोडगेश्वराच्या फंडपेट्या फोडून 12 लाख लंपास
- ताळगांव पंचायतीवर मोन्सेरातांचे वर्चस्व
- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साटेली-भेडशीत रूट मार्च !
- बहुजनांनी भाजपला पाठिंबा द्यावा
- फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून
- दाबोळी, मोपा विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा ई-मेल
- आपल्या जीवनशैलीतून आपल्याला कोकण जपता आले पाहिजे – प्रसाद गावडे
- हल्ल्याप्रकरणी पाच जणांना अटक