प्रतिनिधी / बेळगाव
लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून म. ए. समितीसह भाजप आणि काँग्रेसने प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. म. ए. समितीचे शुभम शेळके यांनी शहरासह ग्रामीण भागात प्रचार केला तर भाजपने उत्तर मतदार संघामध्ये प्रचार केला आहे.
काँग्रेसनेही प्रचारामध्ये आघाडी उघडली आहे. भाजपने अंजनेयनगर, महांतेशनगर या परिसरात प्रचार केला. यावेळी मंगला अंगडी, ऍड. एन. आर. लातूर, सुजाता लातूर, शशिकांत नायक, शिवाजी सुंठकर, एस. एम. खोत, संतोष झवरे, इराप्पा चौगुले यांनी त्यांच्या सोबत प्रचारात भाग
घेतला.
काही भागामध्ये जाऊन कॉर्नर सभाही घेतल्या आहेत. भाजपला विजयी करा, असे आवाहन करण्यात आले आहे. रविवारी रामनाथ मंगल कार्यालय येथे सभा घेतली. आमदार अनिल बेनके यांनी वैभवनगर या परिसरात भाजपचा प्रचार केला. यावेळी त्यांच्या सोबत श्रद्धा अंगडी यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.