गेल्या दोन दिवसांत देसूर, राजहंसगड, नंदिहळ्ळी परिसरात प्रचारफेरी
प्रतिनिधी / बेळगाव
प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झाला असून भाजपने ग्रामीण मतदार संघामध्ये प्रचार सुरू केला आहे. देसूर, राजहंसगड, नंदिहळ्ळी यासह इतर परिसरात प्रचार केला. त्या ठिकाणी भाजपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. विविध ठिकाणी कॉर्नर सभा घेऊन मतदारांच्या गाठीभेटीही घेण्यात आल्या आहेत.
भाजपने गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार प्रचार केला. त्याला सर्वत्रच पाठिंबा मिळाला आहे. श्रद्धा अंगडी, डॉ. सतीश पाटील, आनंद पाटील, श्रीकांत थोरवत यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी ग्रामीण मतदार संघामध्ये जोरदार प्रचार केला आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
काँग्रेसच्या आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन करत भाजपने आपला प्रचार केला असून मंगला अंगडी यांना विजयी करा, असे आवाहन करण्यात आले. घरोघरी जाऊन तसेच कॉर्नरसभा घेऊन हा प्रचार करण्यात आला. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.