कंपनी आयपॅडसह अन्य उत्पादने आणणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऍपल कंपनीच्या वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (डब्लूडब्लूडीसी)2021 या परिषदेचे सादरीकरण 2021 च्या जूनमध्ये होणार आहे. परंतु याच्या अगोदरच कंपनीने एक विशेष कार्यक्रम सादर करण्याची तयारी केली आहे. यामध्ये कंपनीने 20 एप्रिल रोजी स्पेशल स्प्रिंग लोडेड इव्हेंटचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आहे. ऍपलने या कार्यक्रमासाठी मीडियाला आमंत्रित करण्यासही प्रारंभ केला आहे.
ऍपलचा हा स्प्रिंग लोडेड कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 आयएसटी आणि सकाळी 10 वाजता पीडीटी वर सुरु होणार आहे.
कोरोना महामारीच्या कारणास्तव सदरचा कार्यक्रम हा व्हर्च्युल स्वरुपात होणार असून कंपनीच्या कार्यालयीन वेबसाईटसह युटय़ूबवर सहभागी होता येणार असल्याचे सांगितले आहे.
काय अपेक्षा आहेत?
सदर कार्यक्रमातून नवीन आयपॅड, प्रो टॅबलेटला मिनी एलइडी डिस्प्लेसोबत सादर करण्यात येणार आहे. या टॅबलेटची मागील काही दिवसांपासून चर्चाही सुरू राहिली असल्याची माहिती आहे. यासह कंपनी आपला टॅकर म्हणजे एअरटॅगवरील पडदा उघडणार आहे.