मुंबई :
एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी आयटीसीने आपल्या चौथ्या तिमाहितला नफा जाहीर केला असून मागच्या तुलनेमध्ये कंपनीचा नफा अल्पसा घसरणीत राहिला आहे. जानेवारी ते मार्च 2024 या तिमाहीत आयटीसी ांढपनीने 5190 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच अवधीमध्ये कंपनीने 5242 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. सदरच्या चौथ्या तिमाहीत दोन टक्के वाढीसह 19446 कोटी रुपयांचे उत्पन्न कंपनीने प्राप्त केले आहे. मागच्या वर्षी समान अवधीत 19 हजार 58 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले होते. या अवधीत कंपनीने 1.40 टक्के वाढीसह 17,752 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. याच दरम्यान कंपनीने 31 मार्च 2024 ला संपलेल्या आर्थिक वर्षाकरिता 7.50 रुपये प्रति समभाग अंतिम लाभांश जाहीर केला आहे.