प्रतिनिधी / वास्को
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे पुढारी व मुरगावचे माजी नगरसेवक प्रेमानंद उर्फ बाबू नाणोस्कर यांनी प्रचारा दरम्यान, आपल्या निवडणुक जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. यावेळी मुरगावच्या माजी नगराध्यक्ष भावना नाणोस्कर व त्यांचे ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. बाबू नाणोस्कर मुरगावच्या प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणुक लढवीत आहेत. या प्रभागात बाबू नाणोस्कर यांच्याबरोबरच भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संतोष केरकर, समाजसेवक तसेच भाजपा पॅनलचे उमेदवार विनोद किनळेकर, गोवा सुरक्षा मंचच्या पॅनलचे उमेदवार गुरू नागवेकर ससससस निवडणुक लढवीत आहेत. या सर्व उमेदवारांनी घरोघरी संपर्क, बैठका व कोपरा सभांवर भर दिलेला आहे.