मच्छे येथे शिवप्रतिष्ठान आयोजित केलेल्या बैठकीत भिडे गुरूजींनी दिली माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड येथे 32 मण सुवर्णसिंहासन उभारण्याचा संकल्प केला आहे. या सुवर्णसिंहासनाच्या संरक्षणासाठी ‘खडा पहारा’ ही योजना आखली आहे. बेळगाव तालुक्मयातून याला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, एप्रिल 30 पर्यंतच बेळगाव तालुक्मयाची नेंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर बेळगाव जिल्हय़ातील इतर तालुक्मयांमध्ये नोंदणी केली जाणार आहे. महिना अखेर धारकऱयांनी नाव नेंदणी करावी, असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरूजींनी केले.
शिवप्रतिष्ठानच्यावतीने रविवारी मच्छे येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, रायगडाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सुवर्ण सिंहासन उभारले जात आहे. यामुळे रायगड पुन्हा एकदा जगभरात ओळखले जाणार आहे. यासाठी देशभरातून निधी संकलित केला जात आहे. प्रत्येक शिवभक्त आपल्याला शक्मय होईल, इतकी रक्कम यासाठी देवून आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे गुरूजींनी सांगितले. सुवर्णसिंहासनाच्या रक्षणासाठी ‘खडा पहारा’ योजना आखण्यात आली आहे. प्रत्येक शिवभक्ताला आपल्या राजाच्या सिंहासनाला पहारा देता यावा, यासाठी ही योजना केली आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणात नोंदणीची प्रकिया सुरू आहे. बेळगाव तालुक्मयानंतर इतर तालुक्मयांमध्ये नोंदणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष किरण गावडे, शहर कार्यवाहक विश्वनाथ पाटीलसह मोठय़ा संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
शुभम शेळके यांनी घेतले भिडे गुरूजींचे आशीर्वाद
नुकत्याच झालेल्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी रविवारी संभाजी भिडे गुरूजींची भेट घेतली. निवडणुकीदरम्यान आलेले अनुभव शेळके यांनी गुरूजींना सांगितले. गुरूजींनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.