अनोखे वुमन रोबोट पाहून लोक हैराण
अमेरिकेतील एक कंपनी अत्यंत वास्तविक महिला रोबोट्स तयार करण्यासाठी ओळखली जाते. रियल डॉल नावाच्या या कंपनीने इन्स्टाग्रामवर एका अशाच वुमन रोबोटचे छायाचित्र प्रसारित केले आहे. ही पोस्ट पाहिल्यावर अनेक फॉलोअर्स हैराण झाले, जेव्हा त्यांना ही खरीखुरी महिला नसून एक रोबोट असल्याचे कळले.
या वुमेन रोबोटचे नाव ओलिविया असून या छायाचित्रात रोबोटला रडताना पाहिले जाऊ शकते. रियल डॉल कंपनीने एका महिलेचे छायाचित्र प्रसारित केल्याचे अनेक जणांना वाटले पण सत्य समजल्यावर ते अवाप्च झाले.
ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजेन्स सॉफ्टवेअर एक्स-मोडच्या मदतीने या रोबोट्सची निर्मिती करते. एक्स मोड सारख्या उत्तम एआय सॉफ्टवेअरसह आम्ही या डॉल्समध्ये एक मॉडय़ूलर हेड सिस्टीमचा वापर करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या मॉडय़ूलर हेड सिस्टीममुळे हे डॉल्स स्वतःचे हावभाव बदलू शकतात. यापूर्वी असे वैशिष्टय़ कुठल्याच रोबोटमध्ये उपलब्ध नव्हते.
एआय सॉफ्टवेअर एक्स-मोड एक अत्यंत आधुनिक सॉफ्टवेअर आहे. याच्याच मदतीने ही कंपनी स्वतःच्या बहुतांश डॉल्सचे डिझाइन करत आली आहे. या कंपनीने ओलिवियाच्या तीन प्रकार आतापर्यंततयार केले आहे. ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार शीर, शरीर आणि मेकअप-स्टाइल निवडण्याची संधी कंपनी देते. ग्राहकांच्या क्रिएटिव्हिटीसोबत कधीच तडजोड करत नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.