नवी दिल्ली
पॉवरग्रिड इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट ट्रस्टने आपला आयपीओ येत्या 29 एप्रिलला भारतीय भांडवली बाजारात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरच्या आयपीओतून कंपनी 7 हजार 735 कोटी रुपये उभारणार असल्याचे सांगण्यात येते. कंपनीच्या प्रति युनिटचा दर (प्राइस बँड) 99 ते 100 रुपये इतका ठेवण्यात आला आहे. सदरच्या कंपनीची मालकी ही पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडे आहे. या आयपीओमार्फत बाजारात 4 हजार 993.48 कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर केले जाणार आहेत.