बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी राज्य मंत्रिमंडळ सदस्य आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यातील कोरोना परिस्थीचा आढावा घेतला. यावेळी बैठकीनंतर कर्नाटक सरकारने जाहीर केले की ते १८–४४ वयोगटातील लोकांसाठी लसीकरण मोहिम टप्प्याटप्प्याने हाती घेतली जाईल. लस जशी उपलब्ध होईल त्याप्रमाणे लसीकर केले जाणार आहे. तसेच लसीचे आणखी एक कोटी डोस घेणार असल्याचे सांगितले.
याआधी “राज्य सरकार लसीचे एक कोटी डोस खरेदी करीत आहे तर आणखी एक कोटी अतिरिक्त डोस खरेदी करणार असल्याचे म्हंटले आहे. तसेच लसीकरण मोहिमेचा चौथा टप्पा टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी केंद्राने आजपर्यंत राज्यात कोविड लसीचे ९९.४ लाख डोस पुरवले आहेत. तर ९३.४ लाख डोस दिले गेले आहेत, तर आता सुमारे ५.९ लाख डोस उपलब्ध आहेत,” असे ते म्हणाले.