- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत वाढत असलेली कोरोनाची रुग्ण संख्या लक्षात घेत केजरीवाल सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, दिल्लीत आणखी एक आठवड्याभरासाठी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे.
केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दिल्लीत लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढवले आहे. नव्या आदेशानुसार आता दिल्लीत 10 मे च्या सकाळी 5 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे.
दरम्यान, राजधानी दिल्लीत दुसऱ्यांना लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी 25 एप्रिल रोजी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती.
सद्य परिस्थिती पहाता राजधानीत रुग्ण वाढीचा वेग वाढला आहे, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कोरोना साखळी तोडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.