प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट शहरातील येथील दुकानाचा कडी-कोयंडा उचकटून आज प्रवेश करून अडत बाजार येथील किराणा दुकानातील सुमारे एक लाख 63 हजार 572 रुपयाच्या विविध साहित्याची चोरी अज्ञात चोरट्याने केली. ही चोरी 6 मे ते 7 मे च्या दरम्यान झाली. याची अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की या चोरीची फिर्याद नागप्पा शिवराया पाटील वय 57 वर्षे अडत दुकानदार राहणार सुभाष गल्ली अक्कलकोट यांनी दिली. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या आडत बाजार येथील दुकानाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश करून दुकानातील हँडवॉश टूथ पेस्ट बिस्किट गोडेतेल घड्याळ सेल वगैरे असा सुमारे एक लाख 63 हजार 572 रुपयांच्या साहित्याची चोरी केली. ही चोरी 6 मे रोजी रात्री आठ ते दिनांक 7 मे रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान अडत बाजार येथे झाली. अज्ञात चोरटे वर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास एपीआय राठोड करीत आहेत.