लिंक ओपन असताना नोंदणी ठरतेय लाभाची
कोल्हापूर / कृष्णात पुरेकर
कोरोना प्रतिबंधक लसीच्या पाचव्या टप्प्यात 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना लस दिली जात आहे. जिल्ह्यात 7 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे, पण ऑनलाईन नोंदणीत घोळ आहे. लिंक ओपन असताना नोंदणी करणाऱयांना लगेच दुसऱया दिवशी लस मिळत आहे, पण यापुर्वी नोंदणी केलेल्यांना केंद्रांवर पोहोचूनही परतावे लागत आहे. `ऑनलाईन’च्या घोळात रिशेड्युलींगमध्ये तरूणाई व्यस्त आहे.
जिल्ह्यात 1 मे रोजी 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी 5 केंद्रांवर प्रायोगिक तत्वावर लसीकरण सुरू झाले, त्यासाठी 18 हजार डोस आले आहेत. शनिवारी 1 हजार 737 जणांनी लस घेतली. तसेच सप्ताहभरात 8 हजार 982 जणांनी पहिला डोस घेतला आहे. दोन लसीकरण केंद्रे वाढवली आहेत. या वयोगटात मोबाईल वापरणाऱयांची संख्या अधिक आहे. या वयोगटात लसीकरणाची घोषणा होताच आनॅलाईन नोंदणीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रे निश्चित होण्यापुर्वीच आठ दिवसांची ऑनलाईन नोंदणी फुल्ल झाली. पण तारीख आणि केंद्रांची नोंद झाली नाही. परिणामी अनेक जण ऑनलाईन नोंदणी केली आहे, या संभ्रमात राहिले आहेत.
कोवीन ऍपवर ऑनलाईन नोंदणी करताना लस घेण्याचा दिनांक, केंद्र विचारले जाते, प्रारंभी ते मिळत नव्हते, त्यामुळे अनेकांची ऑनलाईन नोंदणी झाली, हे लोक केंद्रावर जाताच नोंदणी केली आहे, असे सांगतात. पण तारीख नसल्याने तेथे वादाचे प्रकार घडत आहेत. दिवसातून केव्हाही नोंदणीसाठी लिंक ओपन होते, पण त्या काळात जे ऑनलाईन असतात, त्यांना केंद्र, अन् लगेंच तारीख मिळत आहे. केंद्रावर `आज’ची नोंदणी असल्यानीच थांबावे, असे पुकारले जात आहे. त्यामुळे शेडÎलिंग, र्नोंदणीनुसार लाभार्थ्यांना लस मिळत असल्याचे दिसून येत आहे.
शेड्युलनुसार नोंदणी होत असल्याने केंद्रावर दिलेले उद्दिष्ट विना गर्दी पुर्ण होत आहे. त्यामुळे नियोजन चांगले असले तरी पुनर्नोदणी, रिशेल्डींग करावे लागत आहे. कोविन ऍपवर रेड स्टार दिसतो, लिंक व्यस्त दिसते, पण ग्रीन स्टार दिसतात लिंक ओपन असल्याचे स्पष्ट होते, यादरम्यान अवघ्या 15 ते 20 मिनिटांत जे नोंदणी करतात, त्यांना हव्या असलेल्या तारखेला नोंदणी मिळत आहे. त्यामुळे यापुर्वी नोंदणी करणाऱयांनी आता पुनर्नोंदणी करणे आवश्यक बनले आहे. पुनर्नोंदणीसाठी मोबाईलवर तरूणाई व्यस्त असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दुसरीकडे ज्या त्या दिवशी नोंदणी असलेल्यांना लस मिळत असल्याने केंद्रांवरील गर्दीचे चित्र कमी झाले आहे. अवघ्या तासाभरात केंद्रांवर शांतता दिसून येत आहे.