अथर्व मेडिकल एड फौंडेशनचे आवाहन
बेळगाव : प्रशासनाने ऑक्सिजन देण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे यापुढे आम्ही सेवा देऊ शकणार नाही. तरी कोणीही आम्हाला ऑक्सिजनसाठी फोन करू नये, आजपर्यंत आम्ही सेवा दिली. मात्र प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आम्हाला नाईलाजास्तव ही सेवा देणे अशक्य झाले आहे. तेव्हा अथर्व मेडिकल एड फौंडेशनला फोन करू नये. रुग्णांनी थेट हॉस्पिटलमध्येच दाखल व्हावे, असे आवाहन अध्यक्ष विजय पाटील यांनी केले आहे. याचबरोबर दिलगिरीही व्यक्त केली आहे.