सेबीकडून विचार सुरू, लवकरच निर्णय
वृत्तसंस्था / मुंबई
आयपीओ संदर्भात काही बदल केल्यानंतर आता लॉक इनच्या नियमावलीमध्ये सिक्युरिटी ऍण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांच्याकडून दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. या बदलामुळे प्रमोटर ग्रुपची परिभाषा बदलली जाण्याची शक्यता अधिक आहे.
सेबीने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही आयपीओनंतर प्रमोटरची कमीत कमी 20 टक्क्यांची हिस्सेदारी तीन वर्षासाठी लॉक इन पीरियडमध्ये राहते. आता यामध्ये घट करुन 1 वर्ष करण्याची तयारी सुरु आहे. यासोबत 20 टक्क्यांपेक्षा अधिक आणि आयपीओच्या अगोदर नॉन प्रमोटर शेअर होल्डिंगवर लागू असलेला 1 वर्षाचा लॉक इन पीरियड कमी करत 6 महिने केला जाण्याची माहिती आहे.
प्रतिसाद विचारात घेणार या संदर्भातील जाणकारांनी म्हटल्याप्रमाणे सेबीच्या या बदलामुळे काही कंपन्यांना याचा फायदा होणार असून कंपन्यांची प्रदीर्घ काळाची मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.