प्रतिनिधी/सातारा
साताऱयात लॉकडाऊन कडकपणे पाळून कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी पोलिसांसह प्रशासन झटत असताना अद्यापही काही नागरिक रस्त्यावर येवून नियमांचा भंग करत आहेत. अशा 27 जणांवर सातारा शहर पोलीस ठाणे व शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शाहू चौक परिसरात विनाकारण दुचाकीवरुन फिरणाऱया सौरभ राजेंद्र जाधव (रा. गोवे, ता. सातारा), निरंजन रविकांत भंवर (रा. लिंब, ता. सातारा), अर्जुन मानसिंग शिंदे (रा. लिंब, ता. सातारा), विशाल अरुण जाधव (रा. लिंब, ता. सातारा) यांच्यावर कारवाई करण्यात आली. हवालदार दीपक कांबळे यांनी त्यांच्याविरुध्द तक्रार दिली आहे.
साताऱयातील दस्तगीर कॉलनीत जिल्हाधिकाऱयांचा संचारबंदी आदेशाचा भंग करुन भांडणे करणाऱया सादिक रज्जाक सय्यद, साजिद असलम शेख, अब्दूल उस्मान मेमन, (सर्व रा. मंगळवार पेठ, दस्तगीर कॉलनी, सातारा) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार शब्बीर मोकाशी यांनी त्यांच्याविरुध्द तक्रार दिली असून पोलीस नाईक घोडके पुढील तपास करत आहेत.
शाही मशिदीसमोर आदेशाचे उल्लंघन करणाऱया अरिज ईस्माईल शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा, कौस्तुभ चंद्रकांत खरे (रा. गजानन सोसायटी, कराड), ओंकार अशोक माने (रा. मंगळवार पेठ, सातारा), अक्षय दिलीप पाटील (रा. रविवार पेठ, कराड), किरण गुलाब गावीत (रा. विद्यानगर, कराड), विक्रम पोपट जाधव (रा. कोडोली) यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याविरुध्द हवालदार दीपक कांबळे यांनी तक्रार दिली आहे.
दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना देखील शुक्रवार पेठेत किराणामाल दुकान उघडे ठेवणाऱया प्रदीप शहा (रा. सातारा) तसेच समर्थ मंदिर परिसरात वेळेनंतरही मेडिकल दुकान सुरु ठेवणाऱया रविंद्र निकम (रा. काळोशी, ता. सातारा), आकाश घाडगे, योगेश जाधव, प्रसाद इनामदार (पूर्ण नाव, पत्ते माहिती नाहीत) तसेच राधिका रोडवर मनोरंजन देशी दारु दुकान सुरु ठेवणाऱया नासीर हमीद शेख (रा. समर्थ मंदिर, सातारा) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यांच्याविरुध्द हवालदार सुनील मोहरे यांनी तक्रार दिली आहे. पोलीस नाईक घोडके पुढील तपास करत आहेत.
बाँबे रेस्टारंट परिसरात विनाकारण फिरुन आदेशाचे उल्लंघन करणाऱया अभिषेक जितेंद्र शिवदास (रा. सत्यमनगर, सातारा), जयराम मिर्जाराम वर्मा (रा. दौलतनगर, सातारा), दिनेश नामदेव माने (रा. आदित्यनगरी, सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
कमानी हौद परिसरात विनाकारण फिरणाऱया समीर शरीफ शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा, अरबाज सिराज शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा), हज्जेप फय्याज शेख (रा. सातारा) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याविरुध्द कॉन्स्टेबल गणेश भोंग यांनी तक्रार दिली आहे. पोवईनाक्यावरील केक विक्री दुकान सुरु ठेवून आदेशाचे उल्लंघन करणाऱया अक्षदा विजय धनवडे (रा. सैदापूर, ता. सातारा) तसेच मल्हार पेठेतील डिलाईट बेकर्स दुकान सुरु ठेवल्याप्रकरणी या दोन्ही दुकांनावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरुध्द कॉन्स्टेबल गणेश भोंग यांनी तक्रार दिली आहे.