प्रतिनिधी / बेळगाव
हिंडाल्कोने कोरोना काळात मदतीचा हात नेहमीच पुढे केला आहे. यापूर्वी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर दिल्यानंतर आता हिंडाल्कोच्यावतीने औषधे, सॅनिटायझर, मास्क, सर्जिकल ग्लोव्हज, थर्मामीटर, ऑक्सिमीटर, व्हिटॅमिन टॅब्लेटस् यासह इतर औषधे व साहित्य देण्यात आले.
तालुका आरोग्याधिकारी एस. सी. मास्तीहोळी यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले आहे. हिंडाल्कोने कोरोना काळात जिल्हा प्रशासनाला सर्वपरीने मदत केली आहे. तब्बल 25 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर दिले होते. त्यानंतर औषधाचा साठाही मोठय़ा प्रमाणात दिला आहे. यावेळी हिंडाल्कोच्या एच आर विभागाचे साहाय्यक उपाध्यक्ष विश्वनाथ बी. शिंदे, रवी बिसगुप्पी, सीएसआर हेड सागर जोशी, हिंडाल्कोचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबुराव गुगली, ड्रग कंट्रोल अधिकारी मिथुन भंडारी, डॉ. सुजाता किणगी, वैशाली सौदागर, मौनिष आव्होजी, रेखा बेळगावकर, बी. एस. पिरजादे, श्रुती वाणगी, प्रियांका कुंदगोळ, गीता बजंत्री, मालाश्री शिगानी, राजेंद्र पाटील, प्रवीण बेटगेरी, चेतन हुलीकट्टी आदी उपस्थित होते.