बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. राज्यात ७ जून पर्यंत पूर्ण लॉकडाऊन असणार आहे. दरम्यान लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणार्यांवर बेंगळूर पोलीस कडक कारवाई करीत आहेत. शनिवारी शहरात १,८८० दुचाकी वाहनांसह एकूण २,२०९ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
बेंगळूर पोलिसांनी दक्षिण-पूर्व विभागात सर्वाधिक ४२१ वाहने ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर दक्षिण विभाग (४१०) आणि सर्वात कमी वाहन पूर्व विभागात (१३१) वाहने जप्त केली गेली. लोकांवर लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एकूण २० एफआयआर दाखल करण्यात आल्या. गेल्या काही दिवसांत २१ मे रोजी ८७१ वाहने जप्त करण्यात आली होती; २० मे मध्ये १,२०५ होते, १९ मेरोजी९४१, १८ मेरोजी १,४०४, १७ मेरोजी ५५८, आणि १६ मेरोजी ४१२ वाहने जप्त केली आहेत. जप्तीची पाहणी करीत असलेले केआर सर्कलमधील डीसीपी (सेंट्रल डिव्हिजन) एमएन अनुचेथ म्हणाले की, पोलीस केवळ वाहने जप्त करीत नाहीत तर वाहनधारकांवर फौजदारी गुन्हेदेखील नोंदवत आहेत. ते म्हणाले की, सध्याचा लॉकडाऊन संपुष्टात येताच हा लॉकडाऊन ७ जूनच्या सकाळपर्यंत सुरू राहिल. कसेच बेंगळूर शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांनी सांगितले की, त्यांच्या पोलीस कर्मचार्यांना कारवाई संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.