संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
निलजी येथील तलावाचे सुशोभिकरण करण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र या तलावाची करण्यात आलेली खोदाई आणि बांधलेला वॉकिंग ट्रक कुचकामी ठरला आहे. आताच भेगा पडल्या असून पावसाळय़ात तलावामध्ये बुडून मृत्यू होण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित कंत्राटदाराने अत्यंत निकृष्टदर्जाचे काम केले असून सार्वजनिक बांधकाम खात्याने याची पाहणी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली
आहे.
निलजी येथील सर्व्हे क्रमांक 300 मध्ये तलावाची खोदाई करण्यात आली आहे. तलावाच्या प्रवेशद्वारासमोरच तब्बल 150 फुटाचा खड्डा खोदण्यात आला आहे. त्यामधील काळी माती तलावाच्या बांधणीसाठी वापरण्यात आली आहे. खोदाई आणि तलावाच्या बांधणीसाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र आताच तलावाच्या बांधणीला भेगा पडल्या आहेत. याचबरोबर उभारण्यात आलेले खांबदेखील कधी कोसळतील, याची शाश्वती नाही. याबाबत कंत्राटदाराला विचारले असता तो उद्धट उत्तरे देत आहे. कोणत्याच प्रकारे सहकार्य करण्यास तयार नाही. अनेकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र याबाबत कोणतेच गांभीर्य दाखविले नाही. तेव्हा संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रवेशद्वारासमोरच 150 फुटाचा मोठा खड्डा काढण्यात आला आहे. त्यामध्ये दुर्घटना घडण्याची शक्मयता असून वेळीच तो खड्डा बुजवून त्या ठिकाणी योग्य सपाटीकरण करावे, अशी मागणी होत आहे.